"दिवाळीला कोणतेही फटाके उडविणार नाही..उडवू देणार नाही"

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

"दीपावलीला कोणतेही फटाके उडविणार नाही व उडवू देणार नाही. फटाक्‍यांच्या आवाजाने मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे कानाचे, डोळ्याचे विकार होऊ शकतात. तसेच फटाक्‍यातील विषारी दारूमुळे हवेतून माणसांना, पशुपक्ष्यांना मोठी हानी होते. पाडळी (ता. सिन्नर) येथील पाताळेश्‍वर विद्यालयात पर्यावरण रक्षणार्थ विद्यार्थ्यांना फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली.

नाशिक : पाडळी (ता. सिन्नर) येथील पाताळेश्‍वर विद्यालयात पर्यावरण रक्षणार्थ विद्यार्थ्यांना फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. "दीपावलीला कोणतेही फटाके उडविणार नाही व उडवू देणार नाही. फटाक्‍यांच्या आवाजाने मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे कानाचे, डोळ्याचे विकार होऊ शकतात. तसेच फटाक्‍यातील विषारी दारूमुळे हवेतून माणसांना, पशुपक्ष्यांना मोठी हानी होते.

 फटाकेविरहित दीपावली साजरी करण्याची शपथ 

मी समाजाचा व राष्ट्राचा पाईक या नात्याने अशी प्रतिज्ञा करतो, की दिवाळी सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाके फोडली जातात व त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ही हानी टाळण्यासाठी येणाऱ्या दीपावली सणासाठी मी फटाके फोडणार नाही व हवा व ध्वनिप्रदूषण करणार नाही. फटाक्‍यांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून त्या पैशांतून शिक्षणासाठी आवश्‍यक असणारे साहित्य खरेदी करेल. त्याचप्रमाणे या सुट्यांमध्ये किमान पाच फळझाडांची लागवड करून पर्यावरण रक्षणास हातभार लागेल म्हणून आज मी ही दीपावली पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याची शपथपूर्वक प्रतिज्ञा करीत आहे. 

फटाक्‍याच्या पैशांतून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत 

प्रतिज्ञा घेऊन फटाक्‍याच्या पैशांतून विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनातून ही शपथ देण्यात आली. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pledge to celebrate Deepwali without fireworks