Vidhan Sabha 2019 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संचलन

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये शहर पोलीसांकडून पोलीस ठाणेनिहाय संचलन केले. पोलीस आयुक्तालय हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अधिकारी-कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकडीने पोलीस संचलन केले. 

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये शहर पोलीसांकडून पोलीस ठाणेनिहाय संचलन केले. पोलीस आयुक्तालय हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अधिकारी-कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकडीने पोलीस संचलन केले. 

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे संचलन करण्यात आले. यावेळी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह केंद्रीय सुरक्षा बलाच्या पथकानेही परिसरातून संचलन केले. विशेषत: संवेदनशील भागात पोलिसांनी फौजफाट्यासह संचलन केले. याचप्रमाणे, सातपूर, अंबड, भद्रकाली, पंचवटी, म्हसरुळ, नाशिकरोड, देवळाली, उपनगर, इंदिरानगर, ंमुबई नाका, सरकारवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी सशस्त्र संचलन करण्यात आले. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार संवेदनशिल भागात पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन करण्यात आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police mobilization due to elections at nashik