VIDEO : सदाभाऊ खोत यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक दौऱ्याला सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी मौजे वडाळी भोई (ता.चांदवड) सोमनाथ जाधव यांच्या शेताला भेट दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिले.

नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक दौऱ्याला सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी मौजे वडाळी भोई (ता.चांदवड) सोमनाथ जाधव यांच्या शेताला भेट दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिले.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

शेतकरी सोमनाथ जाधव यांच्या 2 एकर द्राक्ष आणि दिड एकर मिरची याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मा. सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिले. भाऊ म्हणाले, जिल्ह्यातील अशा बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध राहील. प्रशासनाने यामध्ये कुठेही दिरंगाई केल्यास त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कर्ज वसुलीसाठी जमीन लिलावाच्या नोटीसा आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर मा. सदाभाऊ खोत यांनी संबधीत बॅकांना तात्काळ सदर वसुली थांबवण्याच्या सुचना देण्यात येतील, असे आश्वासित केले.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

Image may contain: 6 people, including Pravin Badhan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadabhau Khot inspects damaged crops in Nashik