समजपूर्वक वाचन क्षमता विकसन पुस्तिकेचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा ः
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक ः प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतर्फे बोली प्रभावक्षेत्रात समजपूर्वक वाचन पथदर्शी कार्यक्रमातंर्गत समजपूर्वक वाचन क्षमता विकास पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाले. हा कार्यक्रम शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव आणि जिल्हा प्राथमिक शिणाधिकारी डॉ. वैशाली वीर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. रत्नप्रभा भालेराव यांच्या हस्ते झाला. ही पुस्तिका पेठ, सुरगाणा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी निश्‍चित उपयुक्त ठरेल आणि जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचा उपयोग करावा, असे श्री.

नाशिक ः प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतर्फे बोली प्रभावक्षेत्रात समजपूर्वक वाचन पथदर्शी कार्यक्रमातंर्गत समजपूर्वक वाचन क्षमता विकास पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाले. हा कार्यक्रम शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव आणि जिल्हा प्राथमिक शिणाधिकारी डॉ. वैशाली वीर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. रत्नप्रभा भालेराव यांच्या हस्ते झाला. ही पुस्तिका पेठ, सुरगाणा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी निश्‍चित उपयुक्त ठरेल आणि जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचा उपयोग करावा, असे श्री. बच्छाव यांनी सांगितले. तसेच समजपूर्वक वाचन साठी दर्जेदार पुस्तिका तयार केल्याबद्दल त्यांनी "डायट'च्या मराठी विभागाचे अभिनंदन केले. गेल्यावर्षी प्रादेशिक विद्या प्राधिकरणतर्फे सुरगाणा तालुक्‍यामध्ये पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमता प्रमाणामध्ये वाढ झाली. त्याचधर्तीवर ही पुस्तिका विकसित करण्यात आली. तिचा वापर करून आता पेठ व सुरगाणासह बोली प्रभावी क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम राबवणार असल्याचे मराठी विभागाचे अधिव्याख्याता बाबासाहेब बडे यांनी सांगितले. ही पुस्तिका मराठी विभाग विषय सहाय्यक प्रदीप शिंदे, उदयकुमार कुराडे,मराठी विभाग प्रमुख भगवान खारके यांनी तयार केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Education