धनराज महाले स्वगृही शिवसेनेत अन राऊत शिवबंधनात

Live Photo
Live Photo

नाशिक ः लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस जाॅईन करत दिंडोरी मतदारसंघातून माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. आता श्री. महाले हे स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री. महाले यांनी भगवा खांद्यावर घेतला. तसेच नाशिकच्या भाजपच्या महापाैर रंजना भानसी यांचे बंधू आणि भाजपचे माजी खासदार कचरु महाले यांचे पुत्र दिलीप राऊत यांनीही याचवेळी मातोश्रीत शिवसेना जाॅईन केली.  शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत, मिलिंदजी नार्वेकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सुरेश डोखळे, तालुका प्रमुख सतीश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com