VIDEO : "मी आलोय काळजी करू नका"..शरद पवारांचा बळीराजांना भावनिक आधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

शेतकरी महिलांनी अवकाळी सह सुलतानी माऱ्याने शेतकरी हैराण झाल्याचे सांगताच मी आलोय काळजी करू नका. शेतकरी बांधवांनो तुमच्या हितासाठी रात्रीचा दिवस न थकता सुरू आहे,तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सेना सत्तेत मुशगील असल्याचा टोल लागवत मी बळीराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येईल, असे सांगत शरद पवारांनी आधार दिला.

नाशिक  : अवकाळी पावसाच्या माऱ्यात सापडलेल्या भात पिकांची इगतपुरी तालुक्यातील टाके-घोटी शिवारातील राजाबाई आडोळे यांच्या शेताची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज (ता.१) केली. यावेळी त्यांना शेतक-यांना भावनिक आधार दिला.

शेतकरी बांधवांनो....मी आलोय काळजी करू नका.

शेतकरी महिलांनी अवकाळी सह सुलतानी माऱ्याने शेतकरी हैराण झाल्याचे सांगताच मी आलोय काळजी करू नका. शेतकरी बांधवांनो तुमच्या हितासाठी रात्रीचा दिवस न थकता सुरू आहे,तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सेना सत्तेत मुशगील असल्याचा टोल लागवत मी बळीराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येईल, असे सांगत शरद पवारांनी आधार दिला.

Image may contain: 9 people, including Raju Desale, people standing

माझे पदाधिकारी तुमच्या सेवेत राहतील. काळजी नको.यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार माणिकराव कोकाटे,हिरामण खोसकर,सुधीर तांबे,माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड संदीप गुळवे, संपत सकाळे,गोरख बोडके, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना भाकड,-पागेरे, उदय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाढवे,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष रामदास धांडे यांसह मोठयसंख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Image may contain: 17 people, including Hemant Pote

Image may contain: 11 people, including Hemant Pote, people smiling

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's support to the farmers at nashik