बुद्धिमत्तेच्या जोरावर 'त्याने' मिळविले यश

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत सातपूरच्या कोळीवाड्यातील संदीप पुराणे याने बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑर्थोपेडिक सर्जन होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षणाला पैशांची जोड नसली तरीही बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविता येते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप.

नाशिक : घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत सातपूरच्या कोळीवाड्यातील संदीप पुराणे याने बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑर्थोपेडिक सर्जन होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षणाला पैशांची जोड नसली तरीही बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविता येते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप. 

परिस्थितीवर मात करत संदीप बनला ऑर्थोपेडिक सर्जन 

आठवीत असताना वडिलांच्या निधनामुळे घराची सर्व जबाबदारी त्याच्या आईवर आली. परंतु डगमगून न जाता त्याने उत्तम गुण मिळवत वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण रेले. सध्या तो मुंबईतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. यश मिळाले असले तरीही या यशाचा मार्ग त्याच्यासाठी तितका सोपा नव्हता. जनता विद्यालयात शिकलेल्या संदीपने दहावीत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर केटीएचएम महविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतही उत्तम गुण मिळवले. या काळात डॉक्‍टर होण्याचे स्वप्न त्याला खुणावू लागले. बारावीनंतर सायन हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर नागपूर शासकीय महाविद्यालयातून या वर्षी एमएसची परीक्षाही तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the strength of intelligence 'he' achieved success