विद्यार्थीनींची छेडखानी करणे पडले महागात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

लासलगाव स्थानिक पोलिसांतर्फे  विशेष मोहीम राबवित बुधवारी (ता.१६) रोडरोमीयों विरुद्ध अचानक विविध ठिकाणी कारवाई केली गेली. त्यामुळे महाविद्यालय व शाळा परिसरातील विद्यार्थीनीची छेडखानी करणा-यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी जोरदार स्वागत करीत ही मोहीम अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे.बुधवारी सडक सख्याहरींना दणका देत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.

लासलगाव :  स्थानिक पोलिसांतर्फे सलग दुसऱ्या विशेष मोहीम राबवित बुधवारी (ता.१७) रोडरोमीयों विरुद्ध अचानक विविध ठिकाणी कारवाई केली गेली. त्यामुळे महाविद्यालय व शाळा परिसरातील विद्यार्थीनीची छेडखानी करणा-यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी जोरदार स्वागत करीत ही मोहीम अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे.बुधवारी सडक सख्याहरींना दणका देत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.

परिसरात पेट्रोलिंग करून रोड रोमियोविरुद्ध कायदेशीर कारवाई

या मोहिमेंतर्गत येथील शाळा, महाविद्यालय परिसरातून रोड रोमिओंविरुद्ध शाळा कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून रोड रोमियोविरुद्ध कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती रंजवे यांनी दिली. ही कारवाई रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्यासह योगेश शिंदे, हवालदार नंदकुमार देवडे, प्रदीप अजगे,कैलास महाजन यांनी केली  

१० वाहनचालकांवर कारवाई करीत २५०० रूपये दंड वसुल 

सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी नागरिकांनी आपले पाल्य जर शाळा, महाविद्यालय, विद्यालयामध्ये शिक्षण घेत असतील आणि त्यांचे वय जर १८ वर्षांच्या आत असेल.(अल्पवयीन) किंवा त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर अशा वाहनचालकांवर प्रचलित कायद्याखाली कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित पालकांनी आपल्या पाल्याकडे वाहन चालवण्यास दिल्यास प्रचलित कायद्यानुसार पाल्य व पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student molestation has to be arrested