उदयनराजे भोसले यांना भाजपची ‘वेगळी’ वागणूक?; फोटो व्हायरल

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या सभेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत उदयनराजे भोसले व्यासपीठावर होते. पण, त्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांना वेगळी वागणूक दिली गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पुणे : सध्या उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा विषय खूप गाजत आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर साताऱ्यात त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा भाषण केले. त्यानंतर महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या सभेत काल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर होते. पण, त्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांना 'वेगळी वागणूक' दिली गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पक्षांतर करणाऱ्यांना जागा दाखवणार : शरद पवार

राजेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच ही पोटनिवडणूक लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रवेशावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काहींनी त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय तर, काहींना हा निर्णय पटणारा नाही.

Image may contain: one or more people and people standing

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर युतीचे काय?

काय घडलं नाशिकच्या व्यासपीठावर?
नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवकालीन पगडी घालून सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानंतर आता त्यांचे वंशजही आपल्या सोबत आले आहेत, असे म्हणत उदयनराजे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. तर, पंतप्रधान मोदींनी शिवकालीन पगडी ही एक जबाबदारी आहे, असं सांगत सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. पण, त्याचवेळी पंतप्रधान मोदींचा मोठा हार घालून सत्कार करताना मात्र, उदयराजे भोसले स्टेजवर बाजूला गेल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

काय आहेत प्रतिक्रिया?
यावरून उदयनराजे यांचा निर्णय चुकला अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. तर काहींनी ‘पवारसाहेब राजेंना बाजूला बसवायचे, अशी वागणूक देत नव्हते,’ अशा आशयाच्या कमेंट दिल्या आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ‘आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे,’ अशा शब्दांत खिल्ली उडवल्याचा उदयनराजेंचा एक बाईटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो संदर्भ पकडून, उदयनराजे आणि पंतप्रधान मोदींचा एकत्र फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 udayan raje nashik bjp photo gets viral social media