Vidhan Sabha 2019 : नाशिकमध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात;

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली आहे. महापौर रंजना भानसी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वच मतदार संघात भल्या सकाळी उमेदवार मतदानाचा हक्क बजावत आहेत

शहर-जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त 
 विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता.२१) मतदान होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे १० हजार ५००चा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, संवेदन-अतिसंवेदनशिल भागाला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सतर्कता बाळगली जात आहे. 

 जिल्ह्यात ४५ लाख ४६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक शहरात १ हजार १५४ बूथ असून यासाठी २५४ इमारतींचा वापर करण्यात आला आहे. याठिकाणी ७३५ पोलीस व ५७७ होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात एकूण 33 मतदान केंद्र ही संवेदनशील असून याठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, राखीव दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, होमगार्ड असा एकूण 4 हजार 500 जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 

संवेदन-अतिसंवेदनशिल भागाला तर छावणीचे स्वरुप प्राप्त 
जिल्ह्यात 3 हजार 423 मतदान केंद्र असून 32 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी याठिकाणी सशस्त्र पोलीस-राखीव दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचा ऍक्‍शन प्लॅन तयार केला गेला आहे. यानुसार पोलीस अधीक्षकांसह 2 अपर पोलीस अधीक्षक, 12 उपअधीक्षक, 43 पोलीस निरीक्षक, 118 सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक, 2 हजार 874 पोलीस कर्मचारी, 2 हजार 526 होमगार्ड, गुजरातचे 800 होमगार्ड, 5 सीआरपीएफच्या तुकड्या, 3 जीएसआरपीएफच्या तुकड्या, 3 सशस्त्र रेल्वे पोलीस दलाच्या तुकड्या असा सुमारे 6 हजार 500 पेक्षा अधिक फौजफाटा जिल्ह्यात तैनात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting begins in Nashik