कोणतीही पूर्वसूचना न देता 'या' कंपनीतून कामगारांना काढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अंबड औद्योगिक वसाहतीत मुंगी इंजिनीयरिंग कंपनीतील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेरोजगार कामगारांनी उपोषण सुरू केले आहे.या बाबत सोमवारी (ता.१४) सहाय्यक आयुक्त एस.टी.शिर्के यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. पण समाधान तोडगा निघु शकला नाही 

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत मुंगी इंजिनीयरिंग कंपनीतील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेरोजगार कामगारांनी उपोषण सुरू केले आहे.या बाबत सोमवारी (ता.१४) सहाय्यक आयुक्त एस.टी.शिर्के यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. पण समाधान तोडगा निघु शकला नाही 

ऐन दिवाळी सणाच्या काळात ३५ ते ४० कामगारांना काढले

गेली अनेक वर्षे कंपनीत काम करणाऱ्या ३५ ते ४० कामगारांना ऐन दिवाळी सणाच्या काळात कंपनीने मंदीचे कारण पुढे करत अचानक जुने कामगार काढून नवीन कामगारांची भरती सुरू असल्याचे कामगारांनी कामगार आयुक्त व इतर शासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत पोलीस आयुक्त, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त आदी कार्यालयांना निवेदने देऊनही कामगारांना पुन्हा कामावर घेतलेले नाही. याच्या निषेधार्थ कामगार उपआयुक कार्यालया समोर कामगारनी कुटूंबासह उपोषण सुरू केले आहे. यावेळी नितीन पगारे, अनिल गौतम, रामरतन कहालकर, योगराम भुते, मच्छिंद्र निकम आदीं उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers at Mungi Engineering Company were dismissed without any prior notice