आश्रमशाळेची वेळ सकाळी अकरा ते पाचपर्यंत 

Logo
Logo

नाशिक ः आश्रमशाळांची वेळ सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी सव्वापाच ऐवजी आता अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत अशी राहील. आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी यासंबंधीचे आदेश राज्यातील अपर आयुक्त आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना दिले आहेत. 
आदिवासी विकासच्या आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांच्या मागणीचे निवेदन आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डॉ. कुलकर्णी यांना देण्यात आले. त्यावेळी शिष्टमंडळाकडे वेळेतील बदलाच्या आदेशाची प्रत डॉ. कुलकर्णी यांनी दिली. तसेच अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतननिश्‍चिती करण्यासाठी शिबिर घेण्याच्या सूचना प्रकल्पाधिकाऱ्यांना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आगामी दहा दिवसांमध्ये वेतननिश्‍चितीचे आदेश सर्व प्रकल्पाधिकारी आणि मुख्याध्यापकांनी अंतीम करावेत. ज्या सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशा सर्व आश्रमशाळांमध्ये हा लाभ देण्याची कार्यवाही करावी, असेही डॉ. कुलकर्णी यांनी आदेशात नमूद केले आहे. 

तासिकांमध्ये लवचिकता ठेवावी 
नवीन आश्रमशाळा संहितेतील तरतुदीनुसार शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीसाठी ठरवून दिलेल्या विषयवार तासिका नियोजन लागू राहील. नियोजनाप्रमाणे एका आठवड्यातील अध्ययन कालावधी 45 तासिका (घड्याळी तास 26 ते 28) असतील. स्थानिक परिस्थितीनुसार आवश्‍यकता असल्यास मुख्याध्यापकांनी तासिका विभागणीत लवचिकता ठेवण्यास हरकत नाही, असेही डॉ. कुलकर्णी आदेशात स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com