महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी  दिल्लीश्‍वरांचे झाले नव्हते अधीन : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नवी मुंबई ः छत्रपती शिवाज महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते, अशी घणघणाती टीका आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत साताराचे उदयनराजे भोसले यांच्यावर केली. तसेच मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करुन त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यामुळे कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या, असा विश्‍वास श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सध्य राजकीय स्थिती याबाबत श्री. पवार यांनी संवाद साधला. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षात आपण काय केले हे न सांगता विरोधकांची निंदा नालस्ती करण्यातच धन्यता मानत आहेत, असा प्रतिहल्ला श्री. पवार यांनी चढवला. दरम्यान, साताराचे खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे श्री. पवार यांच्या रडारवर ते राहिलेत. 

श्री. पवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरुन आग्र्याला औरंगजेब दिल्लीश्‍वराच्या भेटीसाठी ते गेले. परंतू खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Politics