कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ अध्यक्षपदी नाशिकचे प्रा. संजय शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नाशिक ः महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे प्रा. संजय शिंदे यांनी आज निवड झाली. तसेच सरचिटणीसपदी पुण्याचे प्रा. संतोष फाजगे आणि उपाध्यक्षपदी वसईचे प्रा. सुनील पूर्णपात्रे यांची निवड करण्यात आली आहे. 

महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी या तीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, महासंघाचे अध्यक्षपद पहिल्यांदा प्रा. शिंदे यांच्या रुपाने नाशिकला मिळाले आहे. श्री. शिंदे यांनी 2009 मध्ये उपाध्यक्ष, 2012 मध्ये कार्याध्यक्ष, तर 2015 पासून सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कनिष्ठ महाविद्यालयांना गणित विषयासाठी पूर्णवेळ शिक्षक मिळाले. तसेच 2014 मध्ये कायम विनाअनुदानितमधून कायम हा शद्ब वगळला गेला. "मविप्र' संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले. 

कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांवर केलेल्या संघर्षाची पावती म्हणून महासंघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. अध्यक्षपदाच्या काळात शिक्षकांच्या प्रश्‍नांवर संघर्ष करत प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.'' 
- प्रा. संजय शिंदे (अध्यक्ष, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Education