राज्यात सहा महिन्यांत १३ वाघांचा मृत्यू

राजेश रामपूरकर
मंगळवार, 24 जुलै 2018

नागपूर - महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत तेरा वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दीड वर्षात राज्याने तब्बल ३४ वाघ गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाघांचा मृत्यू होण्याचा आकडा घसरला, ही राज्यासाठी कौतुकाची बाब आहे. परंतु, भविष्यात वाघांचा मृत्यू होऊ नये यासाठी वनाधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.  

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा, चंद्रपूर जिल्ह्यात पाच, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि धुळे वृत्तात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला. या वर्षी प्रथम २३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागात नैसर्गिकरीत्या वाघ मरण पावला होता. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक सात वाघ गमावले. त्यात गोरेवाडा बचाव केंद्रात वाघांच्या चार नवजात बछड्यांचा समावेश होता. यानंतर २५ फेब्रुवारीला भान्सुली वन बीटमध्ये एका वाघाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या वाघाचा मृत्यू म्हणजे वन विभागाचा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जाते. 

Web Title: 13 tigers died in six months