प्रेमासाठी जिल्हाधिकारी बनले वाहनचालक 

याेगेश फरपट - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

प्रत्येकाने जाेपासावी श्रमप्रतिष्ठा - जिल्हाधिकारी
प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने सहकारी म्हणुन वागणुक द्यावी. श्रमप्रतिष्ठा जाेपासत प्रत्येकाने दुसऱ्याचा आदर करावा अशी सुचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मनाेगतातुन दिली. प्रत्येकाने नियाेजनबध्द आयुष्य जगण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

अकाेला - कुणीतरी असं म्हटलं आहे की, ‘एक तरी नातं असं असावं, मनापासुन मनाला पटणारं, .. मैत्रीच्या पलीकडे अन प्रेमाच्या अलीकडे ऋणानुबंध जपणारं ..’ अगदी या वाक्याला साजेसा निराेप आपल्या सेवानिवृत्त वाहनचालकाला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी (ता.३) दिला. आपल्या घरी पाहुणचार करुन वाहनचालक दिगंबर ठक यांना शासकीय वाहनात (जिल्हाधिकाऱ्यांच्या शिटवर) मागे बसवुन स्वतः ड्रायव्हींग करीत सत्कारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. हा जगावेगळा निराेप समारंभ पाहण्यासाठी जिल्हाधिकारी परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली हाेती. 

कृतज्ञता आणी कृतघ्नता हे दाेन खुप छाेटेशे शब्द असतात. आपल्या विचारक्षमतेची, व्यक्तीमत्वाची आणि जीवनशैलीचे दर्शन घडवतात. त्यामुळे एखाद्याचे आयुष्य कसे फुलून जाते. याचा अनुभव गुरुवारी अनेकांनी अनुभवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाचे चालक दिगंबर ठक हे ३१ अाॅक्टाेबरराेजी सेवानिवृत्त झाले. महसूल भागात ३३ वर्षे सेवा दिलेल्या या वाहनचालकाने जिल्हाधिकाऱ्यांचा ‘रथ' सुस्थीतीत चालविला. जिल्हाधिकारी डी. चक्रवर्ती, डॉ. श्रीकर परदेशी, परिमल सिंह, जी.श्रीकांत यांच्या कार्यकाळात सेवा दिली. सेवानिवृत्तीनिमित्य त्यांना आगळावेगळा निराेप दिला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाहनचालक दिगंबर ठक यांना सीटवर  मागे बसवुन स्वतः गाडी त्यांच्या निराेपसमारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चालवत आणली. यानंतर लाेकशाही सभागृहात त्यांचा सपत्नीक प्रशस्तीपत्र व चांदीची गाडी सप्रेम भेट दिली. याच कार्यक्रमात सेवानिवृत्त तहसिलदार दीपक बुलबूले (खरेदी अधिकारी पुरवठा विभाग) यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मिलींद शेगावकर, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पारडे, तहसीलदार राजेश्वर हांडे, डॉ. भास्कर सगणे, वैद्यकीय अधिकारी मीना शिवाल आदी उपस्थीत हाेते. यावेळी राजेंद्र नेरकर, शालीनी ठक राखाेंडे, शुध्दाेधन जंजाळ, गजानन थाेरात आदींनी मनाेगत व्यक्त केले. शेवटी दिगंबर ठक यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश अंधारे तर आभार जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी मानले. 

मॅडमने केला पाहुणचार
जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर अविरत सेवा देणारे दिगंबर ठक यांना जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी साेनम श्रीकांत यांनी कुटूंबीयासहीत पाहुणचार केला. त्यांच्या पत्नी व मुलीचे आदरतिथ्य केले. यामुळे ठक कुटूंब भारावुन गेले हाेते.

प्रत्येकाने जाेपासावी श्रमप्रतिष्ठा - जिल्हाधिकारी
प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने सहकारी म्हणुन वागणुक द्यावी. श्रमप्रतिष्ठा जाेपासत प्रत्येकाने दुसऱ्याचा आदर करावा अशी सुचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मनाेगतातुन दिली. प्रत्येकाने नियाेजनबध्द आयुष्य जगण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

Web Title: Collectors become driver for fans