भ्रष्ट निवृत्त अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : विजय काळे

अनिल सावळे
गुरुवार, 19 जुलै 2018

नागपूर : राज्यातील विविध महामंडळांत गैरव्यवहार केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत निवेदनाद्वारे केली. 

नागपूर : राज्यातील विविध महामंडळांत गैरव्यवहार केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत निवेदनाद्वारे केली. 

राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या एमआयडीसी, एमटीडीसी, सिडको यासह विविध महामंडळांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आढळले आहे. विशेषतः सिडकोमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यास आर्थिक मलईचे पद दिल्याचे आणि त्या पदावर असताना त्यांनी गैरव्यवहार केल्याचे महालेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले आहे. राज्य सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गैरव्यवहाराबाबत सेवानिवृत्तीनंतर कारवाई करण्यात येते. परंतु महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही.

महामंडळांमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची पुन्हा कंत्राटी पद्धतीने नेमणूक करून भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तींना लगाम घालावा, अशी मागणी आमदार काळे यांनी केली. 
 
Web Title: Demand for action against corrupt retired officers