सातबारा कोरा करून राज्यात दुष्काळ जाहीर करा : डॉ. अजित नवले 

रामेश्वर काकडे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

वर्धा : राज्यातील शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत सापडला असून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. त्यासाठी शेतकरयांचा सातबारा कोरा करून सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. अजय नवले यांनी गुरुवारी (ता.11) वर्धा येथे पत्रकार परिषदेतून केली. 

वर्धा : राज्यातील शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत सापडला असून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. त्यासाठी शेतकरयांचा सातबारा कोरा करून सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. अजय नवले यांनी गुरुवारी (ता.11) वर्धा येथे पत्रकार परिषदेतून केली. 

पावसाने दडी मारली, तर परतीचा पाऊस आला नाही, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी 30 जून 2018 पर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, पीककापणी प्रयोग पारदर्शी करून जनावरांचा चारा, पाणी, रोजगार, रेशन, आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर न केल्यास महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने 15 नोव्हेंबरला मुंबई येथे राज्यव्यापी मेळावा घेऊन त्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 

यापूर्वी आणेवारी पद्धतीने दुष्काळ जाहीर केला जात असे. मात्र केंद्र शासनाच्या 2016 च्या संहितेनुसार पर्जन्यमान, पीक परिस्थितीत, पेरणी, मातीतील आद्रता या निकषानुसार दुष्काळ ठरवला जाणार असल्याने दिलेल्या निकषाखाली पातळी आली तरच दुष्काळ जाहीर करण्यात येईल. या चुकीच्या पद्धतीने नव्हे तर जुन्या पद्धतीनुसार तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे म्हटले आहे. 

दुष्काळाच्या छायेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी 20 जून 2018 पर्यंत कर्जमुक्ती द्या, पिकांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, पीकविमा योजनेची रास्त अलबजावणी करा, हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी सरकारने पुरेशी केंद्रे सुरू करावीत, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करा, दारूच्या कारखान्याला पाणी देणे थांबवावे, अशी मागणी केली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, या  मागण्या घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापूर येथे दोनदिवसीय शेतकरी शाळा व मुंबई येथे शेतकरी मेळावा त्यानंतर दिल्ली येथे लाँगमार्चच्या ठिकाणाहून आंदोलनाला प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. लोडशेडींगमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने बळीराजा सावकारी पाशात अडकल्याची टीकाही डॉ. नवले यांनी केली. पत्रकार परिषदेस राजाध्यक्ष किसन गुजर, राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरुण लाटकर, राजू हटवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Immediate declared of drought in the state Dr. Ajit Navle