'मराठ्यांनी आता मूक नव्हे बोलके व्हावे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - आरक्षणासाठी मूक मोर्चे काढण्याऐवजी आता मराठ्यांनी आता बोलले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

लेखिका डॉ. ज्योती लांजेवार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अपर्णा लांजेवार उपस्थित होते.

मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांचा संदर्भ देऊन डॉ. कसबे म्हणाले, आता मराठ्यांनी मूक मोर्चे काढू नये. आता मराठ्यांनी बोलले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा व ओबीसी समाजांद्वारे द्वंद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. याची जाणीव आता सर्वांनी ठेवण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या रूपाने समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा ग्रंथ दिला आहे. या प्रवाहाला अवरुद्ध करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत आहे. या शक्तींचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन या फॅसिस्टांच्या मागची शक्तीस्थळे शोधली पाहिजे. तरच हा देश प्रगतीच्या दिशेने जाईल, नाहीतर या देशाचे लोकशाही समृद्ध करणारे पर्यावरण दूषित होण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मानचिन्ह देऊन डॉ. कसबे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अजय चिकाटे यांनी केले.

Web Title: opinion of senior intellectuals Raosaheb