वृद्ध कलाकारांना वेळेत मानधन देण्याचा आदेश 

अनिल सावळे
गुरुवार, 19 जुलै 2018

नागपूर : पुणे जिल्ह्यातील वयोवृद्ध कलाकारांना वेळेत मानधन देण्याबाबत जिल्हा परिषदेला आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. अनुदानाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना निवेदन दिले होते; परंतु 2014-15 पासून आत्तापर्यंत काही कलाकारांना अनुदान मिळालेले नाही. 

या संदर्भात तावडे म्हणाले, "2014-15 ते 2016-17 या वर्षांत 180 पैकी 130 कलाकारांना मानधन अदा केले आहे. पुणे जिल्हा परिषदेला उर्वरित कलाकारांचे चुकीचे बॅंक खाते क्रमांक मिळाले, त्यामुळे त्यांचे मानधन खात्यावर जमा झालेले नाही. चालू वर्षात मानधन मंजूर झालेल्या 60 कलाकारांची यादी प्राप्त झाली आहे; परंतु त्यांचाही बॅंक तपशील प्राप्त न झाल्यामुळे मानधन देता आले नाही. याबाबत संबंधितांना आदेश दिला आहे. 
 
Web Title: Order to honor old artist by giving honorarium