रिपाइं आठवले गटाचा राज्यात एकमेव नगरसेवक 

कृष्णा लोखंडे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 मार्च 2017

अमरावती - राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणूक रिंगणातील रिपाइं आठवले गटाच्या एकूण जागांपैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला. केवळ अमरावती वगळता राज्यात नऊही महापालिकांमध्ये या पक्षाला प्रवेश मिळू शकला नाही. विशेष म्हणजे, रिपाइंचा गड मानल्या जाणाऱ्या मुंबईतही या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. पुणे महापालिकेत या पक्षाचे नगरसेवक "कमळा'वर निवडून आलेत. 

राज्यातील मुंबई 17, नागपूर 19, अकोला 1, अमरावती 2 या महापालिकांसह ठाणे, सोलापूर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिचवड, नाशिक या दहा महापालिकांच्या 21 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत रिपाइंने (आ) उमेदवार रिंगणात उतरविले होते. पैकी अमरावती वगळता एकाही महापालिकेत या पक्षाला जागा जिंकता आलेली नाही. अमरावती महापालिकेत या पक्षाने प्रकाश बनसोड व प्रा. प्रदीप दंदे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली होती. प्रकाश बनसोड विजयी झाले; तर प्रदीप दंदे यांचा निसटता पराभव झाला. बनसोड सलग पाचव्यांदा निवडून आलेत. महापालिकेत नगरसेवक म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आलेले प्रकाश बनसोड रिपाइंचे राज्यातील एकमेव सदस्य आहेत. संपूर्ण राज्यात महापालिकेत सलग पाचवेळा रिपाइंच्या तिकिटावर निवडून आतापर्यंत कुणीही आलेले नाही, हे विशेष. 

रिपाइंची कॉंग्रेस, राष्ट्रवादी व आता भाजपसोबत युती आहे. महापालिकेच्या निवडणुकीत अमरावती महापालिकेत ते स्वतंत्र लढले. दोन जागांवर लढत होती; पैकी बडनेरा नवी वस्ती प्रभागातून प्रकाश बनसोड यांनी खुल्या संवर्गातून विजय संपादन केला व ते राज्यातील रिपाइं आठवले गटाचे एकमेव नगरसेवक ठरलेत. 

Web Title: RPI group one coprorator elected in maharashtra