जाणत्या राज्याजवळ शेतकऱ्यांनी दु:ख केले हलके 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मागील वर्षीची दुष्काळाच्या मदत नुकसानीची माहिती जाणून घेतली. परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व अनिल देशमुख यांनी काटोल तालुक्‍यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी त्यांच्या बांधावर जाऊन केली.

नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कामठी व कुही तालुक्‍यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या जाणत्या राजासमोर शेतकऱ्यांनी त्यांच्या मनातील दु:ख हलके केले, तर पवार यांनी त्यांना दिलासा देत पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्‍वासन दिले. 

मागील वर्षीची दुष्काळाच्या मदत नुकसानीची माहिती जाणून घेतली. परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व अनिल देशमुख यांनी काटोल तालुक्‍यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी त्यांच्या बांधावर जाऊन केली. राज्याचे सर्वांत मोठे नेते बांधावर आल्याचे पाहून शेतकऱ्यांनीही आपले दुःख त्यांच्यासमोर हलके केले. 
 

Image may contain: 4 people, crowd and outdoor

सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे नुकसान 
यावर्षी दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे केले आहेत. मात्र त्याबद्दल शेतकरी समाधानी नाहीत. पंचनामे योग्य पद्धतीने झाले नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातून अशा अनेक तक्रारी असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्यात आखलेला नुकसान भरपाईचा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. 

Image may contain: 1 person, sitting

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची जाणून घेतली व्यथा 
पवार यांनी संत्रा उत्पादक पट्ट्यातील काटोल व नरखेड तालुक्‍यातील तर धान उत्पादक पट्टयातील कामठी व कुही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची भेट घेतल्या व त्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. काटोल, नरखेड तालुक्‍यातील शेतामध्ये जाऊन कपाशी, संत्रा व इतर पिकांची पाहणी केली. यावेळी प्रत्येक शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी चारगाव, हातला, काटोल, खानगाव या काटोलच्या तर नरखेड तालुक्‍यातील नायगाव, भारसिंगी, घोगरा, खापा या गावांना भेटी दिल्या. शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. 

Image may contain: 2 people, people smiling, crowd, tree and outdoor

यासोबतच त्यांनी कामठी तालुक्‍यातील महालगाव-आसोली व सावळी-गारला या गावांत तर कुही तालुक्‍यातील मांढळ-वग येथे भेट दिली. या दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, आ. ख्वाजा बेग, माजी आमदार सुनील शिंदे, आमदार, प्रकाश गजभिये, राहुल देशमुख, चंद्रशेखर चिखले यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar meet farmers of vidarbha