माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

अकोला : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी (ता. 10) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अकोला : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील सहकार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव रामराव धोत्रे यांचे शुक्रवारी (ता. 10) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणारे वसंतराव धोत्रे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसो बढे येते 14 फेब्रुवारी 1937 रोजी झाला होता. सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर येथील ओझोन रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांच्या तापडियानगर येथील घरून काढण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे हा मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
देशातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. अमरावती येथे मुख्यालय असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. बोरगाव मंजू (आताचा अकोला पूर्व) विधानसभा मतदारसंघातून ते 1984 मध्ये आमदार झाले होते. 1986 ते 1988 या काळात शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार राज्यमंत्री होते.

सहकार क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला
जन्म ः 14 फेब्रुवारी 1937
गाव ः पळसो (बढे), अकोला
शिक्षण ः नागपूर विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी
सामाजिक व राजकीय कारकीर्द
1960 साली सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली.
1965 ते 1986 अशी 21 वर्षे त्यांनी अकोला सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्‍टरी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
1967 ते 1985 अशी 19 वर्षे ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
1965 ते 1986 या 21 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अकोला जिल्हा कुक्कुट विकास सहकारी संस्था लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
1971 ते 1986 या 15 वर्षांत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.
1985 ते 1990 विधानसभा सदस्य (आमदार बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ)
1987 ते 1994 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक
1985 ते 1998 अशी 13 वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक.
1986 ते 1988 महाराष्ट्र राज्याचे (सहकार व वने) राज्यमंत्री
1989 ते 1993 महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष.
1989 ते 1997 पर्यंत अकोला जिल्हा सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे उपाध्यक्ष.
1991 ते 2001 अशी 10 वर्षे दि निळकंठ सहकारी सूतगिरणी लिमिटेड अकोलाचे ते अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी विणकर संस्था महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक होते.
1993 ते 2000 या कालावधीत ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे संचालक होते. 1994 ते 2002 या आठ वर्षांत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.
1997 ते 2002 ते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे संचालक होते.
1991 ते 1993 या तीन वर्षांत त्यांनी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड न्यू दिल्लीचे संचालक
1997 पासून 10 वर्षे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती या संस्थेचे अध्यक्ष.

Web Title: vasantrao dhotre passes away