चित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान

नितीन नायगांवकर
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - "जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके दुष्काळग्रस्त असताना चित्रपट काढून पाणी जिरणार नाही. इथे लाईट-कॅमेराची नव्हे, तर थेट ऍक्‍शनची गरज आहे,' असे मत सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने आज (मंगळवार) येथे व्यक्त केले. पाणी फाऊंडेशनच्या कामानिमित्त विदर्भाच्या दौऱ्यावर आला असताना त्याने नागपुरात पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. 

"चित्रपटापेक्षा मोठे आणि जमीनीवरचे काम आम्ही करतोय. महाराष्ट्रातील चार हजार गावांमध्ये जलसंधारणाचे काम सुरू आहे. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये वीस हजारापेक्षा अधिक गावकऱ्यांनी पाणलोटाचे प्रशिक्षण घेतले.

चित्रपट काढला तर लोक आनंद लुटतील, संवेदनशीलही होतील. पण चित्रपटांमधून पाणलोटाचे प्रशिणक्ष देता येणार नाही, हा मुख्य फरक आहे,' असे सांगून आमिरने केवळ महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. तो म्हणाला, "जनजागृतीसाठी चित्रपट काढला, तर तो जगभरात बघितला जाईल. पण आमचे लक्ष केवळ महाराष्ट्रातील 75 तालुक्‍यांवर आहे. जिथे कामाची गरज आहे, तिथे थेट संपर्कात आहोत. चित्रपटाने या कामावर फोकस राहणार नाही.' राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचेही कौतुक केले. "राज्य सरकारची जलयुक्त शिवार ही उत्तम योजना आहे. दरवर्षी पाणलोटाचे मोठे काम होत आहे. आम्ही केवळ याला लोकचळवळीचे स्वरुप दिले, एवढेच. सरकार आणि पाणी फाऊंडेशनशिवाय राज्यात अनेक एनजीओ काम करीत आहेत,' असेही त्याने सांगितले. या कामांमध्ये "क्रेडिट' घेण्याची स्पर्धा नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

Web Title: Water conservation aamir khan movie