esakal | Wari 2019 : मनाला भिडणारी वारी
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram-and-Dnyaneshwar

बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा..
वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून...
तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे....
असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला.

Wari 2019 : मनाला भिडणारी वारी

sakal_logo
By
सचिन शिंदे

ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी
बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा..
वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून...
तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे....
असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो आत्ताही सुरूच आहे. मात्र माध्यम बदलते आहे. काॅलेजची पोर म्हणजे मोबाईल मध्ये दंग, बोलायचे कळत नाही. वागायचे कळत नाही. नुसत्या चॅटींग न खराब केलेत. असे अनेक तक्रारींचे सुर समाजात उमटताना दिसातात. मात्र अशा तक्रारी करणाऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊली अाणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आणले पाहिजे. म्हणजे आजचा  तरूण व नवी पिढी काय करते याचे त्यांना आकलन येईल. मोठ्या दोन्ही पालखी सोहळ्याला  स्वच्छ, निर्मल व हरीत करण्यासाठी हजारो विद्यार्थी धावताहेत. पहाट नाही, रात्र नाही ते केवळ पळताहेत फक्त न फक्त स्वच्छतेसाठी, निर्मल अन हरीत वारी होण्यासाठीच. एक, दोन नव्हे तर 35 हजार विद्यार्थी त्यात सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत पंझरा हजार विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. पुढे पंढरपूर पर्यंत त्यांची संख्या वाढणार आहे.

दोन्ही वारीत 50 लाख पत्रावळ्या वाटून त्यात राहणारे खरकाटे गोळा करण्याचे त्यांचे ध्येय आहे. दोन्ही वाटेवर पंढरपुर येईपर्यंत पाच हजार झाडे ते लावणार आहे. खरकाटी पत्रावळी गोळा करून ती खतासाठी वापरली जाणार आहेत. आत्तापर्यंतच्या वाटचालीत दहा लाख पत्रावळ्या गोळा केल्या आहेत. त्या खत तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे. संत ज्ञानोबा माऊली व जगदगुरू तुकोबाराय पालखी सोहळ्यात स्वच्छता, हरीत वारीसाठी काॅलेज, शाळेचे युवक धावताहेत. निव्वळ नव्या पिढीला नाव ठेवणाऱ्या, त्यांच्या  नावाने बोट मोडणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी स्वच्छता पालखी तळावर डोळ्यात भरते आहे. पालखी मु्क्कामी आली की, त्यांचे काम सुरू होते. पालखी मार्गस्थ झाली की, स्वच्छता सुरू होत. उंडवडीच्या माळावर भर पावसात आज साडेचार तास स्वच्छता मोहीम त्या शाळा, काॅलेजच्या पोरांनी केली. वारकऱ्यांनी जेवुन पडलेल्या दिड लाख पत्रावळ्या त्यांनी गोळा केल्या. 

वारी एक आनंद सोहळा आहे. मात्र येथे स्वच्छता राहण्याबाबत सतर्कता नाही ठेवली तर अवघड स्थिती होते. मात्र अलीकडच्या काळात स्वच्छतेचे मोठे महत्व वारीत वाढले, वारकऱ्यातहू ते रूजते आहे. त्याचा पाया काॅलेज व शाळात शिकणाऱ्या पोरा, पोरींनी घातला आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केंद्र  सरकारच्या युवा क्रीडा व खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशीलता कार्यरत झाली आहे. त्यात शिवाजी विद्यापीठ,  नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुंबईचे एस.एन.डी.टी महीला विद्यापीठ, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांचाही मोठा सहभाग आहे. त्या सगळ्यांच्या  सहयोगाने स्वच्छ, स्वस्थ आणि निर्मल-हरित वारी उपक्रम यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालखी मार्गावर राबविण्यात येत आहे. त्याद्वारे 20 हजार वृक्षारोपण, 500 प्रबोधनपर पथनाट्य, 50 लाख पत्रावळी वाटप व पुन्हा त्याचे संकलन केले जाणार आहे. जमा होणाऱ्या पत्रावळीद्वारे खतनिर्मिती केली जाणार आहे.

त्या खताचे शेतकऱ्यांना मोफत वाटप होणार आहे. याशिवाय आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे त्या माध्यमातून वारकऱयांची आरोग्य तपासणी होणार आहे. दोन्ही वारीच्या आत्तापर्यंत  63 ट्रॉली कचरा संकलन झाला आहे.

त्यात पंधरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. 250 पथनाट्याद्वारे   150 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. वाटेत पाच हजार 
वृक्षांचे रोपण केले आहे. त्यासाठी पाच हजार विद्यार्थी झटले आहेत. एक हजाल 234 विद्यार्थ्यांनी दिड लाख लोकांपर्यंत निर्मलवारी  
पोचवली आहे. सत्तर डाॅक्टरांनी 518 विद्यार्थ्यांच्या मदतीने 22 हजार 751 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठू मोटे कष्ट घेतले आहेत. दोन्ही वारीत आत्तापर्यंत झालेल्या वाटचालीीच दहा लाथ पत्रावळ्या वाटून त्या पुन्हा गोळा केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना या कार्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, विलास उगले, रासेयो संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. संदीप देशमुख विद्यार्थ्यांचे संघनायक आहेत. राजकुमार रिकामे, गोरख रुपनवर, योगेश बोराटे, स्वामीराज भिसे प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करून घेताहेत. स्वामीराज किर्तन सांगातात. त्यातूनहू ते स्वच्छतेचे महत्व पटवून देतात. आजची मुल, मुली अशी आहेत. आपल्यावेळी असे नव्हते बर का, असा चर्चेचा सुर उमटवून चर्चा घडविणाऱ्या रोजच्या कामातून घटकाभर वेळ काढून वारीत यावे. नव्या पिढीचे काम पहावे. खरच त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा प्रसंग दिसेल. वारीतील स्वच्छतेचा, निर्मलतेचा व हरीत वारी व्हावी, यासाठीचा बदल व्हावा, यासाठी झटणारी नवी पिढी स्वच्छतेची चळवळ कशी उभी करत आहे, त्याचाही अनुभव येईल...