wari 2019 : खाकी वर्दीतील वारकरी

Sant-Tukaram
Sant-Tukaram

सेवे लागी सेवक  झालो........
तुमच्या लागलो निज चरणा......

तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता. येणाऱ्यांशी आदबीने ते बोलत होते. वाटेत जरा जरी वेगळ काही दिसल की त्याची व्यवस्था करण्याच्या सुचना देत होते. पोलिस नसून वर्दीतील वारकरीच असल्याचे जाणवत ते वावरत होते. सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ती  व्यवस्था केली होती. त्याचा चांगला इम्पॅक्ट जाणवत होता.

वारकऱ्यांसाठी त्यांनी तिर्थक्षेत्र पोलिस उपक्रम हाती घेतला आहे. वारकऱ्यांना निवास, भोजन, पर्यटन व दर्शन अशा सगळ्याच गोष्टीत पोलिस मदत करणार आहेत. तीच संकल्पना तीर्थक्षेत्र पोलिस संकल्पनेतून उभा राहत आहे. त्यामुळे नेहमी काठी हातात घेत बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्याही आज काठ्या दिसत नव्हत्या. काठ्या हातात घेवू नका, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. हजारो लोकातील गुन्हेगार ओळखण्याची कसब त्यांच्यात आहेच. त्यामुळे वारीच्या काळात काहू होलू नये, यासाठी 258 लोकांना हद्दपारही केले आहे. कित्येक पोलीस वारकऱ्यांच्या वेशात त्यांनी वारीत ठेवले होते. वारकऱ्यांची सुरक्षेला प्राधान्य देतानाच त्यांनी वारकऱ्यांचा आदर कसा राहिल, याची काळजी घेतल्याचीही जाणीव होत होती. संत तुकोबारांच्या पालखीचे स्वागतास ते आले होते.

त्यावेळी त्यांच्या समवेत किमान शंभर लोकांनी सेल्फी काढला. त्यात काही वारकरीही होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर, कऱ्हाड, पुणे, ठाणे व आत्ता सोलापूर येथे सेवा बजावली आहे. प्रत्येक ठिकाणी गुन्हेगाराला शासव व सामान्याला न्याय देण्याची त्यांची भुमिका राहिली आहे. त्याचा वारीच्या निमित्ताने सोलापूरातही प्रत्यय येत होता.

खाकी वर्दीत राहुनही वर्दीतील वारकरी म्हणून त्यांचा उल्लेख करावाच लागेल. मोठ्या पदावर असतानाही साधेपणा अंगात आणणे ही तितकीशी साधी गोष्ट नाही. मात्र त्याला पोलिस अधीक्षक नक्कीच अपवाद ठरले आहेत. 

संत तुकोबारायांच्या वाटचालीत बारमतीपासून असाच एक  अवलीया पोलिस अधिकारी होते. इंदापूरचे पोलिस उपाधिक्षक नारायण शिरगावकर असे त्यांचे नाव. वाटचालीत वास्तविक बंदोबस्तात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या हातात काठ्या होत्या. मात्र पोलिस उपाधीक्षक गावकर यांच्या हातात कॅमेरा होता. बंदोबस्ताचा ताण सहन करत पोलिॊ उपाधीक्षक शिरगावकर वारीती  वेगळेपण कक्षमेराबद्ध करत होते. वारी, तिची परंपरा व वारकऱ्यांची दैनंदीनी त्यांनी कॅमेऱ्यात टिपली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे झाले. त्या रिंगणात श्री. शिरगावकर कॅमेरा घेवून फिरत होते. अनेकांचे चेहरे टीपत होते. अनेत प्रसंग कॅमेराबद्ध करत होते. इंदापूरच्या रिंगणातही तोच अनुभव आला.

रिंगणात फोटो काढताना त्य्ंना एका पोलिसाने चक्क हटकले. ओ जरा एका बाजूने फोटो घ्या असे तो पोलिस शिरगावकर यांना म्हटला मात्र त्याला काही न बोलता केवळ स्मित हास्य करुन त्यांना जागा बदलली, ही त्यांचा खासीयत पोलिस दलात अावश्यक असणारी कृती होती. पोलिस ना मग पैसे खाणारच. त्याशिवाय त्यांना काय जमते. यासह पोलिसांविषयी चर्चा घडत असते. दोन चाल टक्क्यांमुळे ती घडत असेलही मात्र पोलिस अधीक्षक पाटील, उपाधीक्षक शिरगावकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारू शकते. पालखी मार्गावर अशा अनेक चांगल्या व्यक्ती आहेत. ज्यांच्यामुळे सामान्यांना वेगळी ओळख मिळते आहे. कदाचीत संत तुकोबारायांच्या सेवे लागी सेवक झालो, या अभंगाची प्रचीती येताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com