उच्च शिक्षितांना बनायचेय पोलिस शिपाई ! 

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - एमबीए, एमकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, बी. ई. आदी उच्च शिक्षितांना पोलिस शिपाई बनायचे आहे. या पदाकरिता राज्यभरातून 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. त्यात अडीच लाख अर्जदार पदवीधर, तर 18 हजार 626 पदव्युत्तर आहेत. 

मुंबई - एमबीए, एमकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, बी. ई. आदी उच्च शिक्षितांना पोलिस शिपाई बनायचे आहे. या पदाकरिता राज्यभरातून 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. त्यात अडीच लाख अर्जदार पदवीधर, तर 18 हजार 626 पदव्युत्तर आहेत. 

राज्य गुन्हे अन्वेषण अहवाल 2016 नुसार राज्यात पोलिस महासंचालक ते शिपायापर्यंत दोन लाख चार हजार 655 अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यात 26 हजार 236 महिला आहेत. एक लाख लोकसंख्येमागे 170 पोलिस असे प्रमाण आहे. शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्याकरिता गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. या वर्षी राज्यात आठ आयुक्तालये, 31 जिल्हा अधीक्षक आणि एसआरपीएफमधील शिपाई पदाकरिता भरती होणार आहे. शिपाई पदासाठी 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. पोलिस शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण आहे. पण लाखो उच्चशिक्षितांनी अर्ज केला आहे. 12,174 एमए, 2804 एम.कॉम., 569 एमबीए, 694, एमएसडब्ल्यू, इतर 452, मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट 10, एम.एएससी (टेक) 14, एम.एड्‌. 64, मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट 72, एमएससी 897 अशा 18,626 पदव्युत्तर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच अर्ज केलेल्या पदवीधर उमेदवारांमध्ये एलएलबी झालेले 26, फॅशन डिझायनिंग 13, बी. एस. एलएलबी 27, बी. टेक (ऍग्रिकल्चर) 41, बी. एस. (सोशल) 104, बीएसडब्ल्यू 880, बीएमएस 235, बीसीएस 1736, बी. ई. 2493, बी.ए. बीएड. 51, बीसीए 3322, आर्म फोर्स 4886, बीएसई 24 हजार 558, बी.कॉम. 39,274, बी.ए. एक लाख 66 हजार असे एकूण दोन लाख 51 हजार 306 जणांनी अर्ज केले आहेत. उच्च शिक्षण घेऊनही जास्त पगाराची नोकरी मिळत नसल्याने सरकारी नोकरीतील शाश्‍वती आणि इतर फायद्यांमुळे असे उमेदवार पोलिस शिपाई पदाकरिता अर्ज करतात, असे दिसून येत आहे. 

महिलांचाही वाढता कल 
मुंबई पोलिस शिपाई भरतीत यंदाही तरुणांसह महिलांचा अधिक कल आहे. 27,996 महिलांनी अर्ज केले आहेत. ठाण्यासाठी 8,201, पुण्यासाठी 8,735, नागपूरसाठी 7,939, मुंबई रेल्वेसाठी 11,898, गडचिरोलीसाठी 5,520; तर पालघरसाठी 4,011 महिलांनी पोलिस शिपाई पदाकरिता अर्ज केले आहेत.

Web Title: 10 lakh 22 thousand 852 applications from the state for the post of Police