दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी मंजूर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - नागपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासकामासाठी 100 कोटी; तसेच अन्य ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वांच्या स्थळांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. 

दीक्षाभूमीसह कामठी येथील ड्रॅगन पॅलेस; तसेच ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र उभारणे, परळमध्ये संत रोहिदास भवन उभारणे आदी विविध कामांसाठीही राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीकरिता 100 कोटी रुपयांपैकी 2017-18 मध्ये 40 कोटी; तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलसाठी 25 कोटी पैकी 15 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. परळ येथील संत रोहिदास भवन इमारतीसाठी 11 कोटी 12 लाख 51 हजार, ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सामाजिक व सांस्कृतिक केंद्रासाठी 8 कोटी 1 लाख 70 हजार; तर स्वयंसेवी संस्थांना अनुदान म्हणून 2 कोटी 98 लाख इतक्‍या निधीस मान्यता देण्यात आली. 

दीक्षाभूमीसह विविध ऐतिहासिक स्थळांच्या विकासकामासाठी मंजूर केलेल्या निधीमध्ये शासनाचा 90 टक्के; तर संबंधित संस्थेचा 10 टक्के सहभाग असणार आहे, असेही बडोले यांनी सांगितले. 

Web Title: 100 crore approved for development of Deekshabhoomi nagpur news