मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात एक हजार सोलर कृषिपंप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

औरंगाबाद - विजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असल्याने महावितरणने सोलर कृषिपंपांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात तब्बल एक हजार शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप देऊन महावितरणने कौतुकास्पद पाऊल टाकल्याने शेतकरी सुखावले आहेत.

औरंगाबाद - विजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असल्याने महावितरणने सोलर कृषिपंपांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात तब्बल एक हजार शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप देऊन महावितरणने कौतुकास्पद पाऊल टाकल्याने शेतकरी सुखावले आहेत.

विजेची उपलब्धता आणि मागणीनुसार त्याचे वितरण करण्याचे महावितरण कंपनीसमोर नेहमीच अव्हान असते. विजेच्या कमतरतेमुळे वीज भारनियमन करणे अपरिहार्य असते. भारनियमन केल्याने शेतकऱ्यांच्या पीकपरिस्थितीवर परिणाम होतो. याशिवाय अनेक भागांत वीज पोचलेली नाही, अशा भागांतही शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने अटल सौर कृषिपंप योजना हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाने जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केलेले आहे. त्याचाच भाग म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, धुळे नंदुरबार या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यासाठी उपव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतला. तातडीने शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यासाठीची योजना आखली. प्रत्येक जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या समितीने लाभार्थी निश्‍चित केले. त्यानुसार मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील एक हजार 48 शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप बसवले आहेत.

असे आहेत बसवलेले सौर कृषिपंप
औरंगाबाद.....लाभार्थी नाही
जालना....313
लातूर....लाभार्थी नाही
बीड....159
उस्मानाबाद........158
नांदेड........37
परभणी..लाभार्थी नाही
हिंगोली......27
जळगाव........191
धुळे.......57
नंदुरबार.......106

Web Title: 1000 solar agriculture pump in marathwada and noeth maharashtra