राज्यातील 101 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

टीम ई-सकाळ
गुरुवार, 11 जुलै 2019

- पुण्यातील समीर नजीर शेख यांची नाशिकला बदली.

मुंबई : राज्यातील 101 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) बदल्या आज (गुरुवार) केल्या आहेत. तसेच तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधीक्षक) यांचाही समावेश आहे.

पुण्यातील समीर नजीर शेख (नाशिक), प्रकाश टिपरे (सोलापूर), डॉ. शिवाजी पंडितराव पवार (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा उपविभाग, पालघर) या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये प्रत्येकी एक पोलिस अधिकारी बदली होऊन आले आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : (कंसात कोठून कोठे बदली झाली आहे त्याचा तपशील)

- सुरेंद्र मधुकर देशमुख (एसीपी, लोहमार्ग मुंबई ते एसीपी पुणे शहर), मच्छिंद्र बाबुराव चव्हाण (एसीपी, लोहमार्ग मुंबई ते एसीपी, पुणे शहर), वैशाली विठ्ठल शिंदे (एसीपी, सोलापूर शहर ते एसीपी, पुणे शहर), कुंडलीक व्यंकटराव निगडे (अप्पर अधीक्षक, सीआयडी, पुणे ते पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) लोहमार्ग, पुणे), मालोजीराव माधवराव पाटील-खाटमोडे (पोलीस उप अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई ते एसीपी, पुणे शहर), अनिकेत गंगाधर भारती (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते पोलीस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), नवनीत के. कावत (परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक ते लोणावळा उपविभाग, पुणे ग्रामीण) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 101 Police Officers Transferred in Maharashtra