राज्यात दिवसभरात १०,६९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रिकव्हरी रेट पोहोचला ९५.४८ टक्क्यांवर
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media

मुंबई : राज्यात दिवसभरात १०,६९७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्याचबरोबर १४,९१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.४८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (10697 new corona patients registered in the state during the day)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज १०,६९७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन १४,९१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आजवर एकूण ५६,३१,६७६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण १,५५,४७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५.४८ टक्के झालं आहे.

Maharashtra Corona Update
भारतीय वंशाच्या महिलेनं जिंकला प्रतिष्ठेचा 'पुलित्झर पुरस्कार'

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६० रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १.८४ टक्के झाला आहे. त्याचबरोबर आजवर राज्यात ३,७८,३४,०५४ पैकी ५८,९८,५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत राज्यात १५.५९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या ९,६३,२२७ कोरोनाबाधित होम क्वारंटाईन आहेत. तर ५,८०७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Maharashtra Corona Update
"पाकला हेच हवंय"; दिग्विजय सिंहांच्या विधानावर भाजपची टीका

त्याचबरोबर पुण्यात शनिवारी ३३१ बाधित रुग्ण आढळून आले. तर ४५९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर १० कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. तर मुंबईत चोवीस तासात ७३३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ७३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत सध्या १५,७९८ सक्रीय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com