सीबीएसई बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE
CBSE

मुंबई : सीबीएसई मंडळामार्फत 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार (ता.6) दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत राज्यातील चार विद्यार्थांनी स्थान मिळवले आहे.

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल 99 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत ठाणे येथील न्यू होरीझोन स्कॉलर्स स्कुलचा अदरी दास याने गुणवत्ता यादीत चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई येथील अपीजय स्कुल नेरूळची दिपसना पंडा हिने गुणवत्ता यादीत 91 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाणे येथील रिलायन्स फाउंडेशन स्कुलची धात्री कुशल मेहता हिने गुणवत्ता यादीत 92 वे स्थान मिळवले आहे. तसेच नागपूर येथील भारती कृष्णा विद्याविहार येथील आर्या जयवंत दाऊ हिनेही गुणवत्ता यादीत सत्तरावे स्थान मिळवले आहे. राज्यातील गुणवत्ता यादीमधील चारही जणांना 497 गुण मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com