दहावीचा निकाल उद्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 8 जूनला (उद्या) जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल mahresult.nic.in बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे.  

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 8 जूनला (उद्या) जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल mahresult.nic.in बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे.  

राज्यभरातून सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा दिली. राज्य शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली होती. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहेत. बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 28 मेला जाहीर झाला होता. त्यानंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 8 जूनला जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. 

Web Title: 10th result will announces tomorrow