राज्यात 11 हजार पोलिसांची पदे रिक्‍त 

राज्यात 11 हजार पोलिसांची पदे रिक्‍त 

सोलापूर : वाढती गुन्हेगारी कमी करणे, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया तसेच राज्यात दिवसेंदिवस निघत असलेले विविध समाजाचे मोर्चे यांसह अन्य कारणांसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा द्यावा लागतो. मात्र, राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची तब्बल 12 हजार 17 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत असून अनेकांना सुट्ट्या मिळणे कठीण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कारकुनी काम कमी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त जबाबदारी सोपविता येईल का, याचेही नियोजन शासन स्तरावरून सुरू आहे. वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांचा वापर अन्य कामांसाठी करता येतो का, याची चाचपणी केली जात आहे. जेणेकरून अपुऱ्या मनुष्यबळावर ठोस तोडगा निघेल. खबरी पद्धत मागील आठ-दहा वर्षांपासून नाहीशी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मनुष्यबळाची गरज असते. परंतु, मागील एक-दीड वर्षांपासून पदोन्नती झालेल्या पदांवर नव्याने भरतीच करण्यात आलेली नाही. 

भरतीवरील बंदी उठविण्यात आली असून रिक्‍त पदांनुसार ज्या-त्या जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. रिक्‍तपदांचा आढावा लवकरच घेऊन निर्णय घेतला जाईल. 

- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री 

रिक्‍तपदांची सध्यस्थिती 

पोलिस उपअधीक्षक 
157 
पोलिस निरीक्षक 
380 
सहायक पोलिस निरीक्षक 
590 
पोलिस शिपाई व हवालदार 
सुमारे 10,890 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com