पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - अर्ध्यामुर्ध्या सरकारमध्ये मनासारखी कामे होत नाहीत. त्यामुळे पुढचे सरकार आमचेच असणार आहे. मी मुख्यमंत्री शिवसेनेचाच बसवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला, तसेच शिवसेना संपवण्याचा, मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची काही जण स्वप्ने पाहत आहेत. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही, आशी पुष्टीही त्यांनी या वेळी जोडली.
 
‘सुवर्णमहोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड‘ या हर्षल प्रधान व विजय सांमत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते आज येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते.

शिवसेना ही भावना आहे. भावना कधीच मरत नसते. त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नाही, असे स्पष्ट करीत ते म्हणाले, ‘आमचे आमदार कमी-अधिक होतील; मात्र जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यत शिवसेना राहणार आहे. आप्तस्वकीयांनी शिवसेनेवर हल्ले केले. तरीही पक्ष खंबीर आहे. टीकाकारांनी टिकण्यासाठी टीका केली. मात्र शिवसेना वाढलीच. शिवसेनेचे महत्त्व आता कळायला लागले आहे. बाबरी मशीद पाडली, मुंबईत दंगली उसळल्या, त्या वेळी शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे कुठे होते? आम्ही भूमिपुत्राची बाजू घेतली की टीका केली जाते. आम्ही हिंदुत्वाचे शिवधनुष्य पेलले की पुन्हा टीका केली जाते.‘‘ दरम्यान, हर्षल प्रधान यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला.

शिवसेना आता पन्नास वर्षांची झाली आहे. अजून पन्नास वर्षांनी जरी आपण नसलो तरी शिवसेना असेल, असा विश्वासही या वेळी त्यांनी जागवला. आजच्या समारंभास मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रवींद्र वायकर, अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

मंत्र्यांना शालजोडा
शिवसेनेमुळे तुम्ही मंत्री झालात. तुमच्यातील शिवसैनिक मरू देऊ नका. नाही तर तुम्हाला किंमत राहणार नाही, असा शालजोडा शिवसेना कार्यकर्त्यांची आणि आमदारांची कामे न करणाऱ्या मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांनी लगावला.