देशात ११,३७९ शेतकरी आत्महत्या

11379 farmers commit suicide in country
11379 farmers commit suicide in country

प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती
मुंबई, - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या करतात.

दरम्यान, २०१४ (१२ हजार ३६०) व २०१५ (१२ हजार ६०२) च्या तुलनेत त्यात २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे.

देशभरातील ११ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सहा हजार २७० शेतकरी शेतजमीन असलेले आहेत, तर पाच हजार १०९ शेतमजुरांचा समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये शेतीविषयक क्षेत्राशी संबंधित ३ हजार ६६१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यात २५५० शेतकरी, तर १ हजार १११ शेतमजुरांचा समावेश आहे. पण, देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही बाब चिंतेची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण, शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ८.६ टक्के महिलांचाही  समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com