esakal | भाजपने दाखवली ताकद; बैठकीला तब्बल 'एवढे' आमदार हजर
sakal

बोलून बातमी शोधा

118 MLA Present in BJP Meeting

महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भारतीय जनता पक्षाने आमदारांची बैठक घेतली असून बैठकीला भाजपचे विधानसभेचे 118 ( भाजप आणि अपक्ष आमदार) तर 19 विधानपरिषद आमदार उपस्थित असल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

भाजपने दाखवली ताकद; बैठकीला तब्बल 'एवढे' आमदार हजर

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई : महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भारतीय जनता पक्षाने आमदारांची बैठक घेतली असून बैठकीला भाजपचे विधानसभेचे 118 ( भाजप आणि अपक्ष आमदार) तर 19 विधानपरिषद आमदार उपस्थित असल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रिय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री विनोद तावडे आदी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. यावेळी आमदारांकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

अजित पवारही राष्ट्रवादीसोबत (व्हिडिओ)

भारतीय जनता पक्षाकडून आमचे सर्व आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, 30 तारखेला होणारी बहुमत चाचणीही यशस्वी होण्याचा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप 30 तारखेला बहुमत सिद्ध करणार की सरकार कोसळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फ्लाय ओव्हरवरुन कोसळली मोटार; थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

दरम्यान, महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसनेही आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवले आहे. कुठलाही आमदार फुटणार नाही याची काळजी पक्षाकडून घेतली जात आहे.

loading image