राज्यात सिंचनामुळे कृषी विकासदर १२ टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

वाशीम - राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेले जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींसारख्या उपाययोजनांमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उणे असलेला कृषी विकासदर यंदा १२ टक्‍के झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशीम) येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री पोहरादेवी येथे आले होते. मुख्यमंत्री म्हणाले, की शासनाने गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरविण्यावर विशेष भर दिला आहे. कृषी पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात कृषी पंपासाठी मागेल त्याला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यात येईल. वाशीम जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. कारंजा, मानोरा तालुक्‍यासाठी येत्या काळात तीन हजार सिंचन विहिरी देण्यात येतील, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

Web Title: 12 per cent growth in agricultural irrigation