उन्हाळी सुट्यांपूर्वी तेराशे बसची खरेदी

Bus
Bus

सोलापूर - राज्य परिवहन विभाग नव्या एक हजार ३०० बस खरेदी करणार असून, त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. शासनाकडून ७०० तर परिवहनच्या वतीने ४०० बस खरेदी केल्या जाणार आहेत. उन्हाळ्यामध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते त्या पार्श्‍वभूमीवर सुटीतच या बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील.

राज्य परिवहनच्या बसचा वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा खर्च व कर्मचाऱ्यांचे वेतन याच्या तुलनेत महामंडळाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा तोटाच सहन करावा लागतोय. जुन्या बसमुळे आणि शिवशाहीचे वाढते अपघात व बसमधील अस्वच्छता या कारणांमुळे अनेक प्रवाशांनी खासगी वाहतुकीला पसंती दर्शविल्याचे चित्र असून, या पार्श्‍वभूमीवर परिवहन महामंडळ वातानुकूलित, स्लीपर कोच आणि साध्या अशा तेराशे बस खरेदी करणार आहे. परंतु, त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करुनही तो मिळाला नसल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com