esakal | बापरे! कोरोना लॉकडाऊन दरम्यान राज्यात ‘ऐवढे’ गुन्हे...
sakal

बोलून बातमी शोधा

133311 Fir registered in Maharashtra during Corona virus lockdown

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यात एक लाख ३३ हजार ३११ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आठ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. हे फक्त दाखल गुन्हे आहेत न दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रामाण यापेक्षा जास्त आहे

बापरे! कोरोना लॉकडाऊन दरम्यान राज्यात ‘ऐवढे’ गुन्हे...

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन दरम्यान राज्यात एक लाख ३३ हजार ३११ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आठ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. हे फक्त दाखल गुन्हे आहेत न दाखल झालेल्या गुन्ह्याचे प्रामाण यापेक्षा जास्त आहे. म्हणजे दिवसाला एक हजार ४६४ गुन्हे महाराष्ट्रात झाले आहेत. यामध्ये २७ हजार २६६ जणांना अटक केली आहे. 
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी २२ मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन जाहीर केला होता. या दिवसात काही गुन्हे कमी होतील अशी आशा होती. परंतु यामध्ये सुद्धा गुन्हेगारीचे सत्र सुरुच होते. सायबर गुन्ह्यांमध्ये व्हॉट्‌सअॅप चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड करणे, फेसबुक पोस्ट्‌स शेअर करणे, टिकटॉकच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ करणे आदीचा सामावेश आहे. याशिवायर विनयभंग आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. कलम १८८ अंतर्गत नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या एक लाख ३३ हजार ३११ आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्टिवटद्‌वारे दिली आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक प्रकारचे व्हॉटसअॅप मेसेजेस फिरत आहेत. या दिवसात बऱ्याच व्हॉटसअॅप पोस्ट्समधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. अशा फॉरवर्ड मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. सर्व व्हॉट्‌सअॅप ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप तयार करणाऱ्यांवर विशेष जबाबदारी आहे की, या करोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात आपल्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची

काळजी सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले होते.
करोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या दिवसांत राज्यामध्ये, काही गुन्हेगार आणि समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत लाॅकडाउनमध्ये सायबर गुन्हे झाले आहेत. जग करोना व्हायरसशी झुंजत असताना या करोना व्हायरसने सायबर गुन्हेगारांना पुरेपूर 'साथ' दिल्याचे पाहावयास मिळत आहे. करोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या थैमानाच्या वातावरणाचा फायदा काहीजण घेत आहेत. लॉकडाउनमध्ये सायबर गुन्हेही झाले आहेत. सर्वांनीच यासंदर्भात खबरदारी घेण्याची गरज आहे. या कालावधीत कोणतेही काम करताना काळजीपूर्वक लक्ष देऊन करणे महत्त्वाचे आहे.

loading image