सरकारी नोकरीत मराठा १४ टक्‍के

दीपा कदम
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातल्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मराठा समाजाची संख्या जवळपास १४ टक्‍के असल्याचे उघड झाले. राज्यातील एकूण ११ लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये याचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. त्यापैकी सरकारी नोकरीतील ‘अ’ वर्गातील नोकरी पटकावण्यास मात्र मराठा समाज पिछाडीवर दिसत आहे. केवळ साडेचार टक्‍के (नऊ हजार) मराठा अधिकारी सरकारी नोकरीत उच्च पदावर आहेत. हा अहवाल ‘सकाळ’ला उपलब्ध झाला आहे. 

या अहवालानुसार राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व एकूण दोन लाख असल्याचे या अहवालात उघड झाले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारला सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे, याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तो अहवाल राज्य सरकारने आयोगाला सादर केला आहे. या अहवालानुसार पोलिस खात्यात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व सर्वाधिक दिसून आले आहे. राज्यातील एक लाख ८३ हजार पोलिस शिपायांमध्ये मराठा समाजातील पोलिस शिपायांची संख्या ४२ हजार  आहे.

उच्च शिक्षणात मागे
आरक्षणाने भरल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही समाजातील पोलिस शिपायांची संख्या मराठा समाजाएवढी नाही. मात्र, उच्च शिक्षणात मराठा समाज काहीसा मागे असल्याचेदेखील यातून स्पष्ट होते. राज्यातील १५ विद्यापीठांमध्ये मराठा शिक्षकांची संख्या केवळ २४० आहे. 

कर्मचारी,अधिकारी संख्या
२ लाख : मराठा समाज
४ लाख १४ हजार : खुला प्रवर्ग 
१ लाख ८ हजार ९०० : अनुसूचित जाती 
५९ हजार १५४ : अनुसूचित जमाती
२३ हजार ६९० : विमु. जाती ‘अ’ वर्ग 
२० हजार ८०० : भटक्‍या जमाती ‘ब’ वर्ग 
२५ हजार ९०० : भटक्‍या जमाती ‘क’ वर्ग 
१६ हजार ५०० : भटक्‍या जमाती ‘ड’ वर्ग
९२ हजार : इतर मागासवर्गीय 
२१ हजार : विशेष मागासवर्गीय
११ लाख : एकूण कर्मचारी

Web Title: 14 percent of Maratha in government jobs