प्रगती, डेक्कन एक्‍स्प्रेससह 12 रेल्वे रविवारपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सततचा पाऊस आणि कर्जत-लोणावळा घाट भागात दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे गाड्या 9 ते 11 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. तसेच पुणे स्थानकातून जाणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे : सततचा पाऊस आणि कर्जत-लोणावळा घाट भागात दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे गाड्या 9 ते 11 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. तसेच पुणे स्थानकातून जाणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर येथील पूरामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. 

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (ता.9) ते रविवार (ता.11) पर्यंत पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस, मुंबई-गदग-मुंबई एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच हुबळी-मिरज-हुबळी एक्‍स्प्रेस (ता. 8 व 9 ), एलटीटी-काझीपेट-एलटीटी एक्‍स्प्रेस (ता.9 व 10), हपा-मडगाव-हपा एक्‍स्प्रेस (ता.8 व 9), कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेस (ता. 8 व 10), कोल्हापूर-मनुगुरू-कोल्हापूर एक्‍स्प्रेस (ता. 9 व 10), मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर (ता.9), सोलापूर-मिरज एक्‍स्प्रेस (ता.9) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यशवंतपूर- निजामुद्दीन एक्‍स्प्रेस दौंड-मनमाड मार्गे तर मैसूर-उदयपूर सिटी एक्‍स्प्रेस दौंड-पुणे मार्गे वळविण्यात आली आहे. 

पुणे रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या गाड्या 

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्‍स्प्रेस (ता.9) 
पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेस (ता.10 व 12) 
पनवेल-नांदेड विशेष गाडी (ता.11)    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 trains in maharashtra cancelled due to heavy rain