दीड लाख पदे भरणार - मुख्यमंत्री

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आर्थिक पाहणी अहवालात सरकारी सेवेत दोन लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी रिक्त पदांवरून सरकारची कोंडी केली होती. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात केवळ बेरोजगारीवरच नव्हे, तर पायाभूत सुविधांच्या बाबतीतही क्रांतिकारी कार्य उभारत असल्याची माहिती दिली. पाच वर्षांत ५७,५०० किमी लांबीचे रस्ते उभारले असल्याने हा एक विक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ८२९३ कोटी रुपयांचे कर्ज उभारून ३०,००० किमीचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे ग्रामीण रस्ते उभारल्याची त्यांनी माहिती दिली. 

शिवस्मारकाला सर्व परवानग्या
मुंबईजवळ उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पूर्वतयारीवर ७० ते ८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्मारकाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ॲटर्नी जनरलला विनंती करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू असून, पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून ४५० फूट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबर २०२० च्या महापरिनिर्वाणदिनी जनतेला स्मारकाचे दर्शन घेता येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com