१५ लाख कामगारांना बांधकामाचे प्रशिक्षण - गौतम चॅटर्जी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘महारेरा’ कायद्यांतर्गत बांधकामाचा दर्जा चांगला राखणे आवश्‍यक आहे. बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाच वर्षांपर्यंत काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला ‘महारेरा’कडे दाद मागता येते. या त्रुटी येऊ नयेत आणि बांधकामावेळी साहित्याचा दर्जा आणि बांधकाम प्रक्रियेची गुणवत्ता योग्य राखली जावी, यासाठी येत्या पाच वर्षांत राज्यातील १५ लाख कामगारांना बांधकामाचे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी दिली. 

महारेरा अर्थात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांच्यातर्फे ‘ट्रेनिंग ऑफ एक्‍स्पर्टस ट्रेनर्स’ या उपक्रमाला गुरुवारी पुण्यात सुरवात झाली. उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन चॅटर्जी यांच्या हस्ते नांदेड सिटीत झाले. ‘क्रेडाई’चे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजित नाईकनवरे, क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचाल डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका ऊर्मिला जुल्का यांबरोबरच कुशल क्रेडाईचे समीर बेलवलकर उपस्थित होते.

 राज्यात सर्वाधिक प्रकल्प 
‘महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक असून, ती ५० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महारेराच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळेच हे शक्‍य झाले. देशात ३५ हजार प्रकल्प नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे १८ हजार प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. ‘महारेरा’तर्फे या ५०० तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे,’’ असे चॅटर्जी यांनी सांगितले.

Web Title: 15 Lakh worker Construction Training gautam chatterjee