राज्यातील 1500 शाळा मुलींच्या स्वच्छतागृहाविना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

मुंबई -  राज्यात सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या 66 हजार 750 शाळा आहेत. त्यापैकी 1647 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नसल्याची कबुली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिली आहे. परिषदेने अन्य शाळांना मुलींच्या स्वच्छतागृहात आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. 

बहुतेक शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृहे आहेत; मात्र योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी मुली त्यांचा वापर करणे टाळतात. त्यामुळे किशोरवयीन मुलींची कुचंबणा होते. परिणामी अनेक मुली शाळाबाह्य होण्याची शक्‍यता असते. या पार्श्‍वभूमीवर किशोरवयीन मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी पुढाकार घेतला आहे. 

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना स्वच्छता योजना राबवण्यासाठी 10 टक्के निधी देण्यात येतो. या निधीतून किंवा लोकसहभागातून मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी, अशी सूचना त्यांनी शाळांना दिली आहे. मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये आरसा, साहित्य ठेवण्यासाठी शेल्फ-हूक, कचरा डबा, पाण्यासाठी बादली व मग, हात धुण्यासाठी साबण, दिवे आदी व्यवस्था प्राधान्याने करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 1500 state schools without girls toilets