राज्यातील 151 तालुक्‍यांत दुष्काळ; गंभीर स्थिती 

राज्यातील 151 तालुक्‍यांत दुष्काळ; गंभीर स्थिती 

मुंबई : प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानीचे राज्यभरात सर्वेक्षण केल्यानंतर अखेर सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्‍यांत गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आज जाहीर केला असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. 

राज्यात यंदा मॉन्सूनने दडी मारली. त्यामुळे बहुंताश पेरण्या वाया गेल्या. तसेच दुबार पेरणी केल्यानंतरही परतीचा मॉन्सून लांबल्यामुळे दुबार पेरण्या वाया गेल्या आहेत. यामुळे खरीप हगांमामध्ये राज्यातील तालुक्‍यांमध्ये दुष्काळ महसूल व वन विभागाने जाहीर केला आहे. 

दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानुसार 180 तालुक्‍यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसान किती झाले आहे. त्यानंतर 151 तालुक्‍यांत गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतच्या उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. 

दुष्काळग्रस्तांना सवलतींचा आधार 
दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाय योजना म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सवलती दुष्काळ जाहीर झालेल्या 26 जिल्ह्यांना लागू होणार आहेत. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सवलतींमध्ये काही वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

- जमीन महसुलातून सूट 
- सहकारी कर्जाची फेररचना 
- शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती 
- कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट 
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी 
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता 
- आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर 
- टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे 

दुष्काळ जाहीर केलेले जिल्हानिहाय तालुके 
- पुणे ः आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, 
- सांगली ः जत, कवठेमहांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी, तासगाव, 
- सातारा ः माण, दहिवडी, कोरेगाव, फलटण 
- सोलापूर ः करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्‍कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, 
- पालघर ः पालघर, तलासरी, विक्रमगड 
- धुळे ः धुळे, सिंदखेडे 
- जळगाव ः अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्‍ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल 
- नंदुरबार ः नंदुरबार, नवापूर, शहादा 
- नाशिक ः बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर 
- नगर ः कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड 
- औरंगाबाद ः औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड, 
- बीड ः आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा 
- जालना ः अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद, जालना, परतूर, 
- नांदेड ः मुखेड, देगलूर, उमरी 
- उस्मानाबाद ः लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम 
- परभणी ः मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू, 
- हिंगोली ः हिंगोली, सेनगाव, कळमनुरी 
- लातूर ः शिरूर, अनंतपाळ 
- अकोला ः बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला 
- अमरावती ः मोर्शी, अचलपूर, चिखलदरा, वरूड, अंजनगाव- सुर्जी, 
- बुलडाणा ः खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, मोताळा, 
- वाशीम ः रिसोड 
- यवतमाळ ः बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, केलापूर, मारेगाव, यवतमाळ 
- चंद्रपूर ः चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीर, राजुरा, सिंदेवाही 
- नागपूर ः काटोल, मळमेश्‍वर, नरखेड 
- वर्धा ः आष्टी, कारंजा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com