लोककलावंतांच्या मानधनासाठी सरकारकडून 16 कोटी रुपये

लोककलावंतांच्या मानधनासाठी सरकारकडून 16 कोटी रुपये

मुंबई : राज्यभरातील सुमारे 30 हजार लोककलावंतांते मानधन सांस्कृतिक विभागाकडून निधी अभावी रखडले होते. हे रखडलेले मानधन राज्याच्या सांस्कृतिक विभागातून लोककलावंतांच्या खात्यात जमा करण्यात आले. राज्य सरकारने 16 कोटी रुपये मानधनासाठी दिले आहेत. 

आमच्या खात्यात आज पैका जमा झालायं, देव तुमचं भल करो...आत्ताच बीपीची औषध आणली...सकाळी तालुक्‍यात जाऊन सोनोग्राफी केली साहेब... असे असंख्य फोन लोककलावंतांकडून गेले दोन दिवस येत आहे. या बोलण्यातून स्पष्ट झाले की, त्यांचे रखडलेले मानधन त्यांना मिळाले. याचे आम्हाला समाधान मिळाले, अशा भावना तमाशा फडमालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केल्या. 

लोककलावंत सामाजिक विषय घेऊन आयुष्यभर त्यावर जनजागृती करतो. याच लोककलावंतांच्या उतारवयात त्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या वयोवृद्ध कलावंत मानधन योजनेवर अवलंबून राहावे लागते. या योजनेअंतर्गत मानधन कधी मिळेल, या आशेने जगत असतात. परंतु निधीच्या तुटीमुळे याच लोककलावंतांना तब्बल सहा महिने मानधनाशिवाय राहण्याची वेळ आली.

अनेक वयोवृद्ध कलावांतांना दोन वेळचे अन्न खाणे मुश्‍किल आहे. तर अनेकांचा औषधांचा खर्च या मानधनातून भागवला जातात. मानधन रखडल्याने अनेक लोककलावंतांना उपासमारीची वेळ आली. अखेर राज्य सरकारने लोककलावंतांची दखल घेत रखडलेले मानधन त्यांच्या खात्यात जमा केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com