मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण - तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नागपूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक पुरावे गोळा करण्याचे काम गेल्या दीड वर्षात करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, तसे शपथपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली असून, मराठा समाजाला ओबीसीत नाही तर स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. यासाठी समाजबांधवांनी लाखोंनी मोर्चे काढले आहेत. अधिवेशनकाळात 14 डिसेंबरला राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने शपथपत्र दाखल करून एकप्रकारे आंदोलनाची हवा काढून टाकली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला 16, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तसा अध्यादेशसुद्धा काढण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. मराठा समाज मागास आहे, याचे पुरावे, दाखले गोळा करण्याचे काम गेल्या दीड वर्षात केले गेले. मंडल आयोग, महात्मा फुले, शाहू महाराज, संत यांच्या दाखल्यांचा अभ्यास करण्यात आला. याच आधारे हा समाज मागास असल्याचे शपथपत्र देण्यात आले. या समाजातील 80 टक्के समाज मागास आहे. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्याठी आवश्‍यक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसीत नाही, तर स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

Web Title: 16 percent reservation for Maratha society