राज्यात 17 लाख परीक्षार्थी 

राज्यात 17 लाख परीक्षार्थी 

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 50 हजार 540 ने घटली आहे. राज्यातील तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना मंडळाने विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. यातील एक विद्यार्थी संगणकाच्या साह्याने, तर दोन विद्यार्थी दुभाषक आणि वाचक यांच्या मदतीने परीक्षा देणार आहेत. 

नऊ विभागीय मंडळात 1 मार्च ते 22 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यातील 16 लाख 41 हजार 568, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार 59 हजार 245 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. राज्यातील 22 हजार 244 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, चार हजार 874 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी सांगितले. 

नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा) आणि गणित (भाग एक आणि दोन) या विषयांसाठी बहुसंचीऐवजी एकच प्रश्‍नपत्रिका असणार आहे. मात्र जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ए, बी, सी, डी अशा चार संचांत प्रश्‍नपत्रिका असेल, असे डॉ. काळे यांनी नमूद केले. 

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचे दडपण कमी व्हावे, यासाठी राज्य मंडळ स्तरावरून 10 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे वाचन आणि आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका देण्यात येतील, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. 

दृष्टिक्षेपात परीक्षा 
- दिव्यांग गटातून आठ हजार 830 विद्यार्थी 
- राज्यात एकूण 252 भरारी पथके 
- विशेष महिला भरारी पथक कार्यरत 
- संबंधित अधिकारी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार, चित्रीकरणही करणार 
- उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, म्हणून बारकोड 

हेल्पलाइन क्रमांक : 
- पुणे विभागीय मंडळ : 9423042627 
- राज्य मंडळ स्तरावर : 020-25705271 आणि 020-25705272 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com