कृषी पंपाची 17 हजार कोटी थकबाकी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई - शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकी तब्बल 17 हजार कोटींपर्यंत पोचली असून, ती वसूल करण्यासाठी ऊर्जा विभागाकडून नवीन उपाययाजेना आखल्या जात आहेत. दरम्यान, थकबाकी असली तरी शेतकऱ्यांना यंदा 2 लाख नवीन कनेक्‍शन देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातून देण्यात आली. 

मुंबई - शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकी तब्बल 17 हजार कोटींपर्यंत पोचली असून, ती वसूल करण्यासाठी ऊर्जा विभागाकडून नवीन उपाययाजेना आखल्या जात आहेत. दरम्यान, थकबाकी असली तरी शेतकऱ्यांना यंदा 2 लाख नवीन कनेक्‍शन देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातून देण्यात आली. 

गेल्या 2 वर्षांत 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्‍शन दिले असून, त्यांनतर आलेल्या मागणीनुसार पुन्हा नवीन 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्‍शन देण्यात येणार आहेत. यासाठी तीन हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे . शेतकऱ्यांकडील 17 हजार कोटींची थकबाकी, पाणीपुरवठा योजनांवरील थकबाकी, पथदिव्यांची थकबाकी मुळे ऊर्जा विभागाचे कंबरडे मोडले आहे. दीनदयाळ योजनेसाठी केंद्र शासनाने 2100 कोटींचा निधी दिला आहे. त्यातून फिडर विलगीकरण करण्यात येत आहेत. अजूनही 700 फिडर विलगीकरण व्हायचे आहेत. येत्या दीड वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा ऊर्जा विभागाचा मानस आहे. शहरी भागातील वीजपुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी केंद्र शासनाने 2500 कोटी रुपये दिले आहेत. अनेक कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. येत्या 2 वर्षांत राज्यात साडेचार हजार कोटींची कामे होत आहेत. गेल्या 30 मार्च रोजी 23055 मेगावॉट वीज मागणी राज्यातील सर्वोच्च मागणी ठरली होती. शेतकऱ्यांना 12 तास दिवसा अखंडित वीज मिळावी म्हणून सोलर कृषी फिडरची योजना तयार होत आहे. आधी या योजनेसाठी 52 कोटी खर्च होणार होता. तो प्रस्ताव आता 8 ते 10 कोटींत होणार आहे. लाइनमनच्या सर्व जागा भरण्यासाठी एक ग्रामपंचायत एक विद्युत व्यवस्थापक ही संकल्पना आणली आहे. आजही राज्यातील 19 लाख परिवारांना वीज मिळत नाही. आदिवासी भागात 100 टक्के लोकांना वीजपुरवठा करण्यासाठी 1400 कोटी खर्च लागणार आहे. 

कृषी पंप वीजबिलाची थकबाकी अशी (रुपयांत) 
अकोला 244 कोटी, बुलडाणा 720 कोटी, वाशीम 278, अमरावती 618, यवतमाळ 686, औरंगाबाद 1267, जालना 882, बारामती 712, सातारा 173, सोलापूर 2021, भिवंडी 138, चंद्रपूर 39, गडचिरोली 28, भंडारा 65, गोंदिया 39, धुळे 571, जळगाव 1464, नंदूरबार 366, पालघर/वसई 16, कोल्हापूर 94, सांगली 358, बीड 1038, लातूर 670, उस्मानाबाद 834, नागपूर 73, वर्धा 93, हिंगोली 461, नांदेड 894, परभणी 587 , नगर 2123, मालेगाव 516, नाशिक 511, पुणे 236. 

Web Title: 17 thousand crore outstanding agricultural pump